आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दसरा मेळावा:भगवान भक्तिगडावर पंकजा मुंडेंच्या भाषणाची उत्सुकता; हेलिकॉप्टरने येणार

पाटोदा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा आज बुधवारी दुपारी राष्ट्रसंत भगवान बाबा यांचे जन्मस्थान असलेल्या तालुक्यातील सावरगाव घाट येथील भगवान भक्तिगडावर होत आहे. पंकजा मुंडे सकाळी ११. ४५ वाजता हेलिकॉप्टरने भगवान भक्तिगडावर येणार आहेत. दुसरीकडे भाजप खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांची गोपीनाथगड ते भगवान भक्तिगड ही वाहन रॅली सावरगाव घाट येथे दुपारी बारा वाजता पोहोचणार आहे. यंदा राज्य व राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाचा काेणताही नेता उपस्थित राहणार नसल्याची प्राथमिक माहिती असून पंकजा मुंडे यांचे भाषण दसरा मेळाव्याचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. आज बुधवारी सावरगाव घाट येथील भगवान भक्तिगडावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यास ऊसतोड कामगारांची संख्या जास्त असणार आहे. त्यामुळे मेळाव्याच्या स्थळी ५०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पंकजा मुंडे यांचे बुधवारी सकाळी साडेअकरा ते बाराच्या दरम्यान सावरगाव घाट परिसरातील कान्होबा मंदिर परिसरातील मैदानावर हेलिकॉप्टरने आगमन झाल्यांनतर त्या सावरगाव येथील संत भगवान बाबा मंदिर परिसरात पोहोचतील. दुपारी १२ ते १२.१० वाजता राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेला सुरुवात होणार आहे.

खा. प्रीतम मुंडे यांची गोपीनाथगड ते भगवान भक्तिगड रॅली
बुधवारी सकाळी सहा वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन भाजपच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या वाहन रॅलीला सुरुवात होणार आहे. गोपीनाथगड, सिरसाळा, दिंद्रुड, तेलगाव, वडवणी, घाटसावळी, बीड, वंजारवाडी मार्गे नायगाव, तांबवा राजुरी, चुंबळी फाटा, वांजरा फाटा, कुसळंब मार्गे ही रॅली भगवान भक्तिगड सावरगाव घाट येथे दुपारी बारा वाजता पोहोचणार आहे.

बातम्या आणखी आहेत...