आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवाली:छेड काढणाऱ्यास चाेप; केले पोलिसांच्या हवाली

माजलगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॉलेजला शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या तरुणास मुलीच्या नातेवाइकांसह जमावाने पकडून चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना शनिवारी शहरातील आंबेडकर चौक येथे घडली.

शहरात महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेली एक मुलगी शिकवणी वर्ग ते महाविद्यालय या रस्त्याने जात असताना एक जण तीच छेड काढून त्रास देत होता. सुरुवातीला तीने या प्रकाराकडे दुर्लक्ष केले मात्र, त्रास वाढल्यानंतर कुटुंबियांना याची माहीती दिली. शनिवारी सकाळी मुलगी शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी दुकानाकडे जात होती.

यावेळी जफर रहिमुद्दीन इनामदार (२९ रा. इंदिरानगर, माजलगाव) याने तिचा पाठलाग करुन दुचाकी आडवी लावून मोबाईल क्रमांकाची मागणी केली. यावेळी नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी त्याला पकडून चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.

शिक्षण बंद होईल म्हणून तिने सहन केले मुलीला तीन-चार महिन्यापासून त्रास दिला जात होता.परंतु घरी हा प्रकार सांगितला तर आई वडील आपले शिक्षण बंद करतील,या भीतीमुळे मुलगी हा त्रास सहन करत होती. मात्र आरोपीचे मनोधैर्य वाढल्याने त्याने तिला अडवले.

बातम्या आणखी आहेत...