आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:बॅग कापून दोन मोबाइल, 49 हजार रुपये लंपास

केज11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कृषी दुकानदाराची उधारी देण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यास वाटेत दोघांनी बोलत थांबवून ओळखीच्या दोघांनी बॅग कापून दोन मोबाइलसह ४९ हजार ५०० रुपयांची रक्कम लंपास केल्याची घटना केज शहरातील जुन्या जनावरांच्या दवाखान्याच्या पाठीमागील रस्त्यावर घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. धर्माळा येथील शेतकरी दिनकर सखाराम गोडसे (४५) यांनी शेतातून काढलेले कोबीचे पीक अंबाजोगाई येथे विक्री करून ४९ हजार ५०० रुपये आले होते. ती रक्कम घेऊन २० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता केज येथील आदित्य कृषी सेवा केंद्राचे दुकानदार विलास जाधव यांची उधारी देण्यासाठी आले होते.

मात्र ते दुकानावर नसल्याने त्यांनी आठवडी बाजारातून भाजीपाला घेऊन सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास ते शहरातील जुन्या जनावरांच्या दवाखान्याच्या पाठीमागील रस्त्याने गावाकडे जाणाऱ्या रिक्षा पॉइंटकडे निघाले होते. तेवढ्यात पाऊस आल्याने त्यांनी खिशातील दोन्ही मोबाइल काढून बॅगमध्ये ठेवले. पैसे व मोबाइल ठेवलेली बॅग बगलात धरून व भाजीपाल्याची पिशवी हातात धरून चालत जात असताना त्यांच्या ओळखीचे केज येथील दशरथ पवार व अरुण काळे हे दोघे पाठीमागून आले. दशरथ पवार हा समोर उभा राहून काय चालले, काय नाही असे बोलून त्याने थांबून धरले.

अरुण काळे हा पाठीमागे जाऊन त्याला धक्का दिल्यासारखे केले. त्यांनी पाठीमागे बघून काय केले असे विचारणा केली असता काही नाही असे म्हणून ते दोघे एकमेकांना इशारा करून निघून गेले. त्यानंतर दिनकर गोडसे हे घरी आले. त्यांनी बॅग बघितली असताना बॅग कापलेली आणि त्यातील दोन मोबाइल व ४९ हजार ५०० रुपयांची रक्कम गायब झालेली होती. त्यानंतर दशरथ पवार, अरुण काळे या दोघांनी बॅगमधून मोबाइल व रक्कम काढून घेतल्याची खात्री पटली.x

बातम्या आणखी आहेत...