आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंडा:सायबर ठग नागरिकांची फसवणूक; वीज बिल थकल्याचा संदेश पाठवून अॅप डाऊनलोड करायला लावले अन् दीड लाखाला घातला गंडा

बीड11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कधी फोन करून एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड बंद पडल्याचे सांगत, तर कधी लॉटरी लागल्याचे सांगून सायबर ठग नागरिकांची फसवणूक करून त्यांच्या बँक खात्याची माहिती घेत खात्यातून रक्कम लंपास करत होते. आता फसवणुकीची नवी पद्धत समोर आली. बीड शहरातील धनंजय डोंगरे यांना वीज बिल थकल्याचे सांगून फसवणूक केली. वीज बिल थकल्याचा त्यांना संदेश आला. त्यासोबत अधिकाऱ्याचा नंबर दिला.

त्या क्रमांकावर फोन केल्यानंतर महावितरणमधून बोलत असल्याचे सांगून एक अॅप्लिकेशन मोबाइलमध्ये डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर खात्यातून तीन वेळा प्रत्येकी ५० हजार या प्रमाणे दीड लाख रुपये लंपास केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर डोंगरे यांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी गुन्हा नोंद केला.

बातम्या आणखी आहेत...