आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्फोट:मालीपारगावमध्ये सिलिंडरचा स्फोट, घरातील साहित्य खाक

माजलगाव17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजलगाव तालुक्यातील मालीपारगाव तांडा येथील ऊसतोड कामगार तोताबाई बालू पवार या गावापासून काही अंतरावरील फाट्याजवळ पत्र्याच्या शेडमध्ये राहतात. शनिवारी पहाटे १ वाजेच्या सुमारास शेडमधील सिलिंडरच्या टाकीचा अचानक स्फोट झाला.

शेडपासून काही अंतरावर मोकळ्या जागेत त्या उकाड्यामुळे झोपल्याने तोताबाई बचावल्या. पहाटे स्फोटाचा आवाज झाल्यानंतर लोकांनी धाव घेऊन शेडला लागलेली आग आटोक्यात आणली. या स्फोटात कपाट, टीव्ही, फ्रिज, धान्य, कपडे, दागिने व रोख २० हजार रुपये असा लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...