आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासकीय अधिकारी:दहीहंडीची जाहीर सार्वजनिक सुटी दिलीच नाही ; शासकीय परिपत्रक प्राप्त झालेच नाही

अंबाजोगाई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहीहंडी उत्सवानिमित्त १९ ऑगस्ट रोजी राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सार्वजनिक सुटी जाहीर केली होती. तसे परिपत्रकही काढण्यात काढण्यात आले. परंतु राज्यात प्रत्यक्षात राज्यातील मोजके शहरे वगळता शासकीय व निमशासकीय कार्यालयांना सुटी देण्यात आलीच नाही. सुटीच्या बाबतीत कुठलेही शासकीय परिपत्रक प्राप्त झाले नसल्याचे शासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, शुक्रवारी दहीहंडीची सुटी न मिळाल्याने अनेक कर्मचाऱ्यांना कुटुंबासमवेत तीन दिवस बाहेर गावी जाण्याचा प्लॅन रद्द करावा लागला.विशेष म्हणजे बीड जिल्ह्याच्या शेजारच्या लातूर जिल्ह्यात मात्र दहीहंडीनिमित्त स्थानिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, तिसरा श्रावण सोमवार १५ ऑगस्ट रोजी आल्याने कर्मचाऱ्यांना ध्वजारोहणासाठी आपापल्या कार्यालया ठिकाणी थांबावे लागले. तिसऱ्या श्रावण सोमवारची स्थानिक सुटी चौथ्या सोमवारी देण्यात यावी, अशी मागणी जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांकडून होत आहे.

बातम्या आणखी आहेत...