आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिकणाऱ्या आर्थिक दुर्बल‎ घटका:दैनंदिन 1 रुपया अनुदान‎ 20 रुपये करावे: मुंडे‎

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पहिली ते चौथीत‎ शिकणाऱ्या आर्थिक दुर्बल‎ घटकातील तसेच आदिवासी‎ क्षेत्राबाहेरील अनुसूचित‎ जाती-जमाती, भटक्या जमाती‎ आदी प्रवर्गातील सावित्रीच्या‎ लेकींना मागील ३० वर्षांपासून‎ नियमित शाळेत येण्यासाठी दिले‎ जाणारे दैनंदिन १ रुपया प्रोत्साहनपर‎ अनुदान वाढवून प्रतिदिन किमान २०‎ रुपये करावे, अशी मागणी माजी‎ मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी शालेय‎ शिक्षण मंत्री दीपक केसरकर‎ यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.‎

धनंजय मुंडे यांनी लिहिलेल्या‎ पत्रात, सन १९९२ साली तत्कालीन‎ राज्य सरकारने क्रांतीज्योती‎ सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीचे‎ औचित्य साधून व त्यांनी‎ दाखवलेला स्त्री शिक्षण व‎ सक्षमीकरणाचा आदर्श घ्यावा.‎

बातम्या आणखी आहेत...