आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाजलगाव तालुक्यातील दिंद्रुड मंडळाला शनिवारी (दि.१८) पुन्हा अवकाळी पावसाने झोडपून काढले. तसेच परिसरातील देवदहिफळ, चाटगाव, हिंगणी बु. व खु., कांदेवाडी, आमला, देवठाणा, जैतापूर, चिखली, फकीर जवळा, कासारी बोडखा, कारी गावांमध्ये आलेल्या अवकाळीमुळे मोठमोठ्या गारांनी झोडपून काढल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासोबतच गेवराई तालुक्यातील आम्ला, वाहेगाव परिसरातील गावात शुक्रवारी रात्री वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. यामध्ये गहू, ज्वारी पिके आडवी झाली.
तर हरभरा, खरबूज, टरबूज या पिकांचे देखील अतोनात नुकसान झाले असून शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. दरम्यान तालुक्यात मागील तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस व गारपीट होत असल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके आडवी झाली आहेत. केज तालुक्यातील बहुतांश गावात मेघगर्जना आणि विजेच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पाऊस पडला असून काही भागात गारपीट ही झाली आहे. पावसाने रब्बीच्या पिकांना फटका बसला असून टरबूज, खरबूजसह फळबागांचे ही नुकसान झाले आहे. तालुक्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून सुर्यदर्शन झालेले नाही. शुक्रवारी मस्साजोग व नांदूरघाट मंडळातील अनेक गावांत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. तर शनिवारी ही दुपारी विडा आणि युसुफवडगाव मंडळात जोरदार पावसाने हजेरी लावली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.