आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस सक्रिय:छेडछाड रोखण्याकरिता आता पुन्हा दामिनी पथके; पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची माहिती

बीड3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिला, मुलींची छेडछाड रोखण्यासाठी जिल्ह्यात आता पुन्हा नव्याने दामिनी पथक तयार करण्यात येणार आहे. प्रत्येक उपविभागात एक पथक तयार केले जाणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली.

जिल्ह्यात यापूर्वी महिला व मुलींची छेडछाड रोखण्यासाठी चिडीमार पथक, महिला गस्त पथक, दामिनी पथक आणि शक्ती पथक अशा विविध नावांनी पथके तयार केली होती. या पथकांना वाहन, दुचाकीही उपलब्ध करून दिल्या होत्या. कोरोना लॉकडाऊन काळात दामिनी पथक बरखास्त केले होते. त्यानंतर पथक तयार केले नव्हते. आता शाळा, महाविद्यालय, खासगी शिकवणी वर्ग सुरू झालेत. या ठिकाणी विद्यार्थिनींना रोडरोमिओंचा त्रास होऊ नये, अशा काही घटना घडल्या, तर मुलींना तक्रार करता यावी, टवाळखोरांवर कारवाई व्हावी व छेडछाडीच्या घटनांना लगाम लागावा यासाठी पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी पुढाकार घेतला आहे. नुकताच त्यांनी सर्व जिल्ह्याचा आढावा घेतला होता. दामिनी पथक सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली होती. त्यामुळे प्रत्येक उपविभागात एक पथक कार्यान्वित होणार आहे.

गळक्या ठाण्यांची दुरुस्ती
एसपी ठाकूर यांनी जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांना पदभार घेतल्यानंतर भेटी दिल्या होत्या. काही ठाण्यांची अवस्था बिकट आहे. पावसाळ्यात इमारत गळते. त्यामुळे अशा गळक्या ठाण्यांची माहिती मागवून घेत तात्पुरत्या दुरुस्तीचे प्रस्ताव पाठवण्यास ठाणे प्रमुखांना सांगितले आहे. यासाठी निधी दिला जाणार असल्याचे ठाकूर म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...