आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाजलगाव तालुक्यातील कष्टकरी सामान्य लोकांची नावे शेतकरी योजनेत टाकल्याने त्यांचे रेशन बंद झाले आहेत. त्यांचा पुन्हा समावेश करुन रेशन सुरु करण्याची मागणी करत सोमवारी माजलगाव तहसिल कार्यालयासमोर ऑल इंडिया युथ फेडरशेनच्या वतीने धरणे आंदोलन केले गेले. माजलगाव शहरातील व तालुक्यातील गरीब सामान्य कुटुंबातील व कामगार कष्टकरी लोकांची नावे शेतकरी योजनेमध्ये टाकण्यात आली आहे.
ह्या लोकांच्या नावाने कोटेही शेती नाही तरी पण लोकांची नावे शेतकरी योजनेत गेलीकशी असा प्रश्न निर्माण झाला आहे व तहसील मधील कामावर असलेले कर्मचारी व राशन दुकानदार यांच्या संगनमताने टाकण्यात आली आहे व ह्या लोकांना राशन पासून वंचित ठेवण्याचा काम माजलगाव तहसीलच्या वतीने करण्यात येत आहे.
लोकांना भूमिहीन प्रमाणपत्र जोडण्याची अट लावण्यात आली आहे. ती रद्द करण्यात यावी व खरे गरजूवंत लोक आहेतत्यांची चौकशी करून तत्काळ राशन सुरु करण्यात यावा व त्याची नावे प्राधान्य ठेव योजनेमध्ये समावेश करण्यात यावी या मगणीसाठी तहसिल कार्यालयासमोर ऑल इंडिया युथ फेडरेशनच्या वतीने धरणे आंदोलना करण्यात आले. यावेळी सहसचिव सादेक पठाण, शेख चुन्नु, शेख अन्वर,गणेश सूळ, मोहमद शेख, खालेद इनामदार, माहदीहसन शेख,नसीर खुरेशी यांच्या सह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.