आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारोहित्र जळाल्याने २२ दिवसांपासून अंधारात असलेल्या शिंदेवाडी (ता. माजलगाव) येथील ग्रामस्थांनी शनिवारी तेलगाव येथील महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. शिंदेवाडी येथे रोहित्र २२ दिवसांपासून जळाले आहे. वारंवार मागणी करूनही महावितरणकडून रोहित्र दिले जात नाही. गावातून महावितरणची वसुलीही ९० टक्के इतकी असतानाही दूर्लक्ष करण्यात येत आहे. वीज नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
यामुळे महावितरणच्या तेलगाव कार्यालयासमोर नागरिकांनी शनिवारी धरणे आंदोलन करून घोषणाबाजी केली. या वेळी राजाभाऊ विघ्ने, महादेव जाधव, दत्तात्रय सुरवसे, सुंदरराव भगत, तुषार माने, राम विघ्ने, रवी भोसले, महादेव विघ्ने, बाबा पवार, भागवत कोळसे, पप्पू विघ्ने, दादाराव बोराडे, अनिरुद्ध मोरे व ग्रामस्थ उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.