आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराज्ञानसागर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था बीडच्या वतीने त्रिरत्न बौद्ध विहार पंचशील नगर बीड येथे पंधरा दिवसीय नृत्य प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रशिक्षणात पंचशील नगर भागातील नृत्त्याची आवड असलेल्या मुला मुलीनी सहभाग घेतला होता. सदर प्रशिक्षणात नृत्य प्रशिक्षक सुमित गायकवाड सर व फुलझळके सर यांनी परिश्रम घेऊन १५ दिवशीय नृत्य प्रशिक्षण यशस्वीरित्या पार पाडले.
प्रशिक्षणार्थ्यांसाठ समारोप कार्यक्रमाचे आयोजन त्रिरत्न बौद्ध विहार पंचशील नगर बीड येथे करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साळवे, निलेश वाघमारे, बचत गटाचे अध्यक्षा विद्यागर, कांबळे, जोगदंड आदी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्याच्या हस्ते प्रशिक्षणात सहभागी मुला मुलीना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सहसचिव श्री मोहन घोडके यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव शेख ताहेर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे प्रतिनिधी विजय विद्यागर, बाळू कांबळे, सय्यद अकबर यांनी अथक परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.