आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरीपूजनाच्या शुभदिनी:बीड येथील स्वाधारगृहाला दानवे यांची भेट

बीड25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गौरीपूजनाच्या शुभदिनी संकटग्रस्त महिलांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करण्यासाठी महाराष्ट्र विधान परिषदेमधील विरोधी पक्षनेते श्री अंबादास दानवे यांनी बीड येथील स्वाधारगृहाला अचानक धावती भेट दिली. तेथील पीडित मुलींच्या पालकांची व कर्मचाऱ्यांची सदिच्छा भेट घेतली.

त्यांचेसोबत राज्य महिला आयोगाच्या सदस्या संगीता चव्हाण, शिवसेना बीड जिल्हा प्रमुख अप्पासाहेब जाधव, अनिल जगताप व कार्यकर्ते, बीड बालकल्याण समितीचे अध्यक्ष अशोक तांगडे व इतर समिती सदस्य, जिल्हा महिला व बालकल्याण कार्यालयातील अधिकारी निर्मळ, जाधव हजर होते. ग्रामीण विकास मंडळ बनसारोळा संचलित बीडच्या या स्वाधारगृहात ३० ते ४० संकटग्रस्त व अत्याचारित महिला व मुली आश्रयाला आहेत. तिथे त्यांचे उत्तम प्रकारे समुपदेशन केले जाते. आणि प्रशिक्षण देऊन त्यांचे पुनर्वसन केले जाते.

काही अल्पवयीन पीडित मुलींच्या पालकांशी संवाद साधण्यासाठी खास करून आजच्या गौरी पूजनाचा दिवस निवडून दानवे संवाद साधला. यावेळी त्यांनी स्वाधारगृहाच्या कर्मचाऱ्यांशी आस्थेवाईकपणे हितगुज केले व स्वाधारगृहाच्या अडीअडचणीही जाणून घेतल्या. यावेळी स्वाधारगृहाच्या अधीक्षिका धनवडे आशा, समुपदेशिका अर्चना कोठावळे व जाधव ऊषा, समुपदेशक उमेश होमकर, कार्यालयीन प्रमुख नेहा सावंत व सुरक्षा रक्षक शब्बीर पठाण यांनी पाहुण्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

बातम्या आणखी आहेत...