आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देखावे:यंदा गणेश मंदिर बांधण्याचा दत्तात्रय मंडळाचा संकल्प ; सामाजिक प्रश्नांवर केली जाते जनजागृती

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

संत-महंताच्या देखाव्यासह समाजातील हुंडाबळी, दारूबंदी अशा ज्वलंत प्रश्नांवर जनजागृती करणारे शहरातील पेठ बीड भागातील साळगल्लीतील श्री दत्तात्रय गणेश मंडळ हे सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करत असून यंदा रक्तदान शिबिर, वृक्षारोपणाबराेबरच विविध सामाजिक उपक्रम राबवत गणेश मंदिर बांधण्याचाही संकल्प या मंडळाने केला आहे.

पेठ बीड भागातील साळगल्लीत दिवंगत माजी नगराध्यक्ष रणजितसिंग चौहान व सुभाष पांडकर, ज्ञानेश्वर पतंगे, बालू मानकुस यांच्या मार्गदर्शनात १९७२ मध्ये सुरेश असलेकर, दत्तात्रय सरवदे, बापू पाटील, राजू गवळी यांनी श्री दत्तात्रय गणेश मंडळाची स्थापना केली हाेती. या मंडळामध्ये नंतर जगन्नाथ शिंदे, बाबा पांढरे, बाबूराव परळकर, अरुण बागडे, नारायण शिवगण, विश्वंभर तपासे, पोपट डोईजड, सत्यवान वारे, सोमनाथ ताठे, कै. सुभाष पांडकर, कै. सुदर्शन पांडकर, कै. राम माथेसूळ, कै. सुभाष बोरा, कै. विजय सरवदे, कै. जोतसिंग चौहान, कै. ओम सरवदे, कै. भगीरथ बागडे, कै. सुरेश तपासे, शरद बागडे, बाबासाहेब देवकते, बबन अबड, गोरख दावडकर, सतीश राऊत, बबन इगडे, रमेश वालुलकर, सखाराम बागडे, गणेश कानगावकर, शशिकांत फटाले, मंगेश निटूरकर, कालिके, लाला दुग्गड, पंडित, अण्णा ढेपे, जाधव, शृंगारे, रामकिशन उपरे, राजू ताठे, पवन राजपूत, धनुरे, अजित माथेसूळ, अनिल माथेसूळ, राम जाधव, मच्छिंद्र उपरे आदींनी विविध सामाजिक उपक्रम राबवत हे मंडळ नावारूपाला आले. या गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या एकीतून अनेक सामाजिक उपक्रम आजही राबवण्यात येतात.

या गणेश मंडळाने शहरातील रोटरी क्लब, नगर परिषद, पोलिस विभाग, गजानन साखर कारखाना, व्यापारी मंडळ यांच्याकडून अनेक पारितोषिके पटकावली. लातूर येथील भूकंपग्रस्तांना मदत गोळा करून या मंडळाने पाठवली होती. एवढेच नव्हे तर बीड येथील पूरग्रस्तांना, अतिवृष्टीधारकांना मदत, रक्तदान, अन्नदान शिबिर, दुष्काळात पाणीपुरवठा केलेला आहे. तसेच मंडळाकडून रांगोळी स्पर्धा, दारूबंदीसाठी प्रबोधन कार्यक्रम, पर्यावरणासाठी झाडे लावणे, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कार्यक्रम घेतलेले आहेत. त्यामुळे बीडमध्ये या मंडळाने आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे.

देखाव्यातून केले समाजप्रबोधन
दत्तात्रय गणेश मंडळाने आतापर्यंत प्रतिघातमधील देखावा, विठू माझा लेकुरवाळा, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक मिरवणूक, गणपती मिरवणूक, शाहिस्तेखानाची फजिती, प्रतिपंढरपूरमधील मठाचा देखावा, साधुसंतांचा देखावा, जादूगार शो अशा अनेक देखाव्यांसह कार्यक्रम सादर केलेले आहेत. उत्कृष्ट आणि प्रबोधनासाठी वेगवेगळे देखावे सादर करत प्रबोधन केले.

बातम्या आणखी आहेत...