आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संरक्षण जाळीत विद्युत प्रवाह:रानडुकरापासून बचावासाठीच्या जाळीला चिकटून मृत्यू

आष्टी6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रानडुकरांपासून डाळिंबाची बाग वाचवण्यासाठी लावलेल्या संरक्षण जाळीत सोडलेल्या वीज प्रवाहाचा धक्का लागून युवा शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (२९ जुलै) पहाटे साडेपाच वाजता घडली. अमोल माणिक नरवडे (३०)असे मृताचे नाव आहे.तालुक्यातील बीडसांगवी येथे घराजवळ माणिक नरवडे यांची डाळिंबाची बाग आहे. रानडुकरांचा मोठा उपद्रव असल्याने त्यांनी रानडुकरांपासून बचाव होण्यासाठी लावलेल्या संरक्षण जाळीत विद्युत प्रवाह सोडला होता. शुक्रवारी पहाटे अमोल नरवडे हा बागेची पाहणी करण्यासाठी गेला होता. परंतु, वीज प्रवाह बंद करण्याचे विसरून गेल्याने विद्युत प्रवाह सुरू असलेल्या संरक्षण जाळीला चिकटून त्याचा मुत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...