आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लांबवले:एसटी व दुचाकी अपघातात मरण; अपघातातील मृत तरुणाचे 1 लाख रुपये अन् दोन मोबाइल लांबवले

केज11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केज-अंबाजोगाई रस्त्यावर झालेल्या एसटी व दुचाकी अपघातात मरण पावलेल्या सतीश गोवर्धन मस्के याच्याजवळच्या एका कॅरीबॅगमध्ये ठेवलेले २ मोबाइल व १ लाख रुपयांची रक्कम लांबवल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी विनोद तांबारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून केज पोलिसांत सुधाकर कविदास काळे (रा. केज) यांच्यावर चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

तालुक्यातील सावळेश्वर (पैठण) येथील मृत सतीश गोवर्धन मस्के (२५) हा विनोद परमेश्वर तांबारे (रा. आंदोरा, ता. कळंब) यांच्याकडे मॅनेजर म्हणून नोकरीस होता. सतीशकडे ट्रॅक्टरद्वारे दगड गोळा करण्यासाठीच्या यंत्राच्या कामाचे १ लाख रुपये जमा होते. १४ जूनला गावाकडे जात असताना पाऊस सुरू असल्याने सतीशने भिजू नये म्हणून २ मोबाइल, एक लाखाची रक्कम कॅरीबॅगमध्ये ठेवले होते. पुढे गेल्यावर त्यांच्या दुचाकी व बसचा अपघात झाला. सतीश मस्के ठार झाला होता, तर त्याचा साथीदार दीपक श्रीहरी डिसले हे गंभीर जखमी झाला होता.

बातम्या आणखी आहेत...