आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Beed
  • Death Mother And 3 Children In Beed | Ambajogai Death Mother And 3 Children News | Marathi News | Death Of 3 Children Including Mother Due To Poisoning; Vomiting After Meal, Unfortunate Incident In Ambajogai Taluka

धक्कादायक!:विषबाधेमुळे आईसह 3 मुलांचा मृत्यू; जेवणानंतर उलट्यांचा त्रास, अंबाजोगाई तालुक्यातील दुर्दैवी घटना

अंबाजोगाई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकाच कुटुंबातील तीन चिमुकले आणि त्यांच्या आईचा विषबाधेमुळे मृत्यू झाल्याची घटना शनिवारी अंबाजोगाई तालुक्यातील बागझरी गावात घडली. आई भाग्यश्री धारासुरे, मुली साधना धारासुरे (६), श्रावणी धारासुरे (४) व मुलगा नारायण धारासुरे (८ महिने) अशी मृतांची नावे आहेत.

बागझरी गावात काशीनाथ दत्तू धारासुरे हे आपल्या कुटुंबीयांसह राहतात. शुक्रवारी रात्री त्यांची पत्नी भाग्यश्री, मुलगी साधना, श्रावणी व लहान मुलगा नारायण या सर्वांनी जेवण केले. जेवणानंतर काही वेळाने त्यांना मळमळ होऊन उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यामुळे शनिवारी सकाळी चारही जणांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना तीन मुलांचा सकाळी मृत्यू झाला.

आईची दिवसभर मृत्यूशी झुंज सुरू होती. रात्री उशिरा उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला. याप्रकरणी बर्दापूर पोलिस ठाण्यामध्ये नोंद झाली असून सहायक पोलिस निरीक्षक अशोक खरात, पोलिस उपनिरीक्षक शिवशंकर चोपणे यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, मृत्यू नेमके कशामुळे झाले हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.

अनुत्तरित प्रश्न

१) गावातील ज्या दुकानातून कोंबडीची अंडी आणली गेली, त्यांची भाजी करून कुटुंबातील सर्वांनी खाल्ली. मग तिन्ही भावंडाचांच का मृत्यू झाला? २) गावातील ज्या दुकानातून ही अंडी भाजीसाठी आणण्यात आली, त्या दुकानदारावर पोलिस काय कारवाई करणार आहेत? ३) ही विषबाधेची घटना घातपाताची नाही असे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे पोलिस सांगतात. मग घटनेमागचे नेमके काय कारण आहे?

बातम्या आणखी आहेत...