आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील शिंपेटाकळी येथील शेतकरी उतरेश्वर गवते यांच्या दोन बैलांना लम्पी आजाराची लागण झाली होती. उपचारा अभावी त्यातील एका बैलाचा शुक्रवारी मृत्यू झाला.
दुसरा बैलासही वेळेवर उपचार न मिळाल्यास दगवण्याची भिती निर्माण झाली आहे.जनावरांना लंपीस्किन आचाराने ग्रासले आसताना सुरुवातीच्या काळात जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगत पशु आरोग्य विभागास दक्ष राहण्याचे सांगितले. काही दिवस सोडले तर पुर्ण पणे दुर्लक्ष झाल्याने माजलगाव तालुक्यात या आजाराचे प्रमाण वाढतच आहे.
तालुक्यातील शिंपेटाकळी येथील उतरेश्वर गवते यांच्या दोन बौलांना जयमहेश शुगर फक्टरीवर ऊस वाहातुकीचे काम करत आसताना लंपीची बाधा झाली होती. मात्र, वेळेवर योग्य उपचार व पशु विभागाचा अनास्थेपणामुळे एक बैलाचा शुक्रवारी मृत्यू झाला. दरम्यान उपचार सुरु असल्याचे पशूधन अधिकारी डॉ. रणजित शेजुळ यांनी सांगितले
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.