आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:वाहनाच्या धडकेमध्ये बालकाचा मृत्यू; दांपत्य जखमी, वाहनासह चालक पसार

केजएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नी जखमी झाले, तर तीन महिन्यांच्या बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात केज-मांजरसुंबा रस्त्यावरील टाकळी-कदमवाडी फाट्यादरम्यान झाला. धडक देणाऱ्या वाहनासह चालक पसार झाला आहे.

केज तालुक्यातील दहिफळ (वडमाउली) येथील दिगंबर मोराळे हे त्यांची पत्नी अंजली मोराळे व तीन महिन्यांच्या बालकासह सोमवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास दुचाकीवरून (एमएच ४४ एल ९१९२) केज-मांजरसुंबा रस्त्याने येत होते. टाकळी-कदमवाडी फाट्यादरम्यान भरधाव आलेल्या एका चारचाकी वाहनाने त्यांना धडक दिली.

या अपघातात दुचाकीवरील हे मोराळे दांपत्य व तीन महिन्यांचे बालक जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच भाजपचे ज्येष्ठ नेते रमाकांत मुंडे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना एका खासगी वाहनातून केजच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांना प्रथमोपचार करून अंबाजोगाईला हलवण्यात आले. बालकाची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला लातूरला पाठवण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

नंबर प्लेट सापडली
दिनकर मोराळे यांच्या दुचाकीला धडक देणाऱ्या चारचाकी वाहनाच्या चालकाने घटनास्थळावरून वाहनासह पलायन केले. मात्र धडक देणाऱ्या त्या वाहनाची नंबर प्लेट घटनास्थळी पडली असून ते वाहन (एमएच १६ सीवाय १५०५) या क्रमांकाचे असल्याचे स्पष्ट झाले.

बातम्या आणखी आहेत...