आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यू:गर्भवती मातेचा अति रक्तस्रावाने मृत्यू; पोलिस सह आरोग्य विभाग करणार चौकशी

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चार महिन्यांच्या गर्भवती मातेचा रक्तस्रावामुळे मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केले. या प्रकरणात पोलिस व आरोग्य विभागाकडून सखोल चौकशी केली जाणार आहे. किताबाई ऊर्फ शीतल गणेश गाडे (३० रा. बकरवाडी, ता. बीड) असे मृत्यू झालेल्या गर्भवती मातेचे नाव आहे.

रविवारी त्यांना रक्तस्राव होऊ लागल्याने नातेवाइकांनी बीडमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणले होते मात्र, डॉक्टरांनी तपासून महिलेची प्रकृती गंभीर असल्याने जिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला होता. जिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन केले. जिल्हा रुग्णालयात शहर ठाण्याचे निरीक्षक रवी सानप यांनीही भेट दिली.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून मुळाशी जाऊ
काही बाबी संशयास्पद आहेत. हा घरीच गर्भपात करण्याचा प्रयत्न होता का? असेल तर असा प्रयत्न का केला. गर्भपाताची औषधे कुठून उपलब्ध झाली अशा अनेक बाबींची चौकशी आवश्यक आहे. आरोग्य विभागाकडून मी स्वत: या प्रकरणात तक्रार देईल. या प्रकरणाची सखोल चौकशी करून मुळाशी जाऊ.
-डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड.

बातम्या आणखी आहेत...