आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ऊसतोडणी होऊन ऊस गाळपास गेल्याने पेटवून दिलेल्या फडात झाेपलेल्या शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील जातेगावमधील श्रीराम वस्ती येथे शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. दिगंबर विक्रम पांढरे (२७) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. शुक्रवारी दिगंबर पांढरे हे गेवराई येथील रोजंदारीचे काम करून रात्री घरी आले होते. मात्र, त्यांना फोन आला अाणि ते घराबाहेर पडल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. रात्रभर घरी न आलेल्या दिगंबर यांचा मृतदेह जाधव यांच्या उसाच्या फडात जळालेल्या अवस्थेत शनिवारी सकाळी आढळून आला.
शनिवारी सकाळी जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यास मृतदेह आणला असताना हा प्रकार घातपाताचा असून खुनाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाइकांनी घेतला हाेता. त्यामुळे तलवाडा ठाण्याचे सपोनि प्रताप नवघरे घटनास्थळी हजर झाले होते. दिगंबर यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन महिन्यांचा मुलगा आहे.
दोघांवर गुन्हा, शवविच्छेदन अहवालाची आता प्रतीक्षा
याप्रकरणी मृत दिगंबर यांची आई सोजरबाई पांढरे यांच्या तक्रारीवरून तलवाडा पोलिसांत काकासाहेब किसन जाधव व राम किसन जाधव यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. शवविच्छेदन अहवाल आणि तपासात नेमका प्रकार स्पष्ट होईल असे तपासाधिकारी एपीआय प्रताप नवघरे यांनी सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.