आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरकुलासाठी उपोषणास बसलेल्या वृद्धाचा मृत्यू:बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील घटना

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरकुल बांधून द्या नाहीतर पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी बीडच्या नगर रोडवरील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन दिवसांपासून उपोषणास बसलेल्या वृद्धाचा रविवारी पहाटे मृत्यू झाल्याची घटना सकाळी ८ वाजता उघडकीस आली. अप्पाराव पवार (६०, रा. वासनवाडी, ता. बीड) असे मृताचे नाव आहे. त्यांच्या मृत्यूनंतर शासकीय अधिकारी तब्बल तीन तासांनी घटनास्थळी पाेहाेचले. दरम्यान, पवार मृत्यूनंतर बीडचे निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी सोमवारी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजता बैठक आयोजित केली आहे.

तालुक्यातील वासनवाडी येथील गायरानावर पारधी समाजातील ४ ते ५ कुटुंबे २००७ पासून राहतात. अप्पाराव पवार, बाबाराव पवार, गणेश पवार व अन्य एका कुटुंबासाठी प्रत्येकी एक अशी चार घरकुले शासनाच्या शबरी योजनेतून २०२० रोजी मंजूर झाली. घरकुलाचे १५ हजारांचे प्रत्येकी दोन हप्तेही मिळाले. या कुटुंबाकडे जागेचा पीटीआर आहे. मात्र, जागेवर घरकुल बांधू नये म्हणून तलाठी आणि मंडळ अधिकारी विरोध करत हाेते. त्यामुळे दाेन वर्षांपासून हे कुटुंब उपोषण करत होते.

बातम्या आणखी आहेत...