आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्याची आत्महत्या:सोनीमोहा येथे कर्जामुळे शेतकऱ्याची आत्महत्या, मुलीच्या लग्नामुळे झाले होते कर्जबाजारी

धारूर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील सोनीमोहा येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची शनिवारी सायंकाळी घडली. सीताराम गंगाधर साठे (४५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

सीताराम साठे यांना दीड एकर शेती असून दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. दोन्ही मुलींचे लग्न झाले आहे. एका मुलीचे महिनाभरापूर्वीच लग्न झाले आहे. शेतीसह ऊसतोडणीचे काम ते करत होते. मुलीच्या लग्नामुळे ते कर्जबाजारीही झाले होते. अल्प उत्पन्नात कुटुंबाचा उदरनिर्वाह व कर्जाची परतफेड शक्य नसल्याने त्यांनी शनिवारी सर्व कुटुंबीय शेतात गेल्यानंतर घरात गळफास घेत आत्महत्या केली. धारूर ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. धारूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...