आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यश निश्चितच:आयुष्यामध्ये एक ध्येय ठेवून निर्धार करावा, यश निश्चितच मिळेल : यशवंत शितोळे

बीड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीवनात कठोर परिश्रमाला पर्याय नाही. आपण आपल्या आयुष्यामध्ये एक ध्येय ठेवून निर्धार करा यश निश्चित तुम्हाला मिळेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांनी केले.

करिअर कट्टा उपक्रमाअंतर्गत येथील सावरकर महाविद्यालयामध्ये मंगळवारी (ता.५ एप्रिल) आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर हे होते तर व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ.राजेश ढेरे यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना यशवंत शितोळे यांनी करिअर कट्टा कार्यक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करिअर कट्टाचे महाविद्यालय समन्वयक प्रा. नारायण शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. रमेश खंडागळे यांनी केले.

यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे देण्यात आली. संवाद कार्यक्रमानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा केंद्रातील विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...