आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या मूर्तीचा आणि शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते श्रीक्षेत्र देहू येथे मंगळवारी (दि. १४) होणार आहे. रामेश्वर भट्टांनी तुकाराम महाराजांची गाथा इंद्रायणी नदीत बुडविली. त्याच नदीच्या काठावर संत तुकाराम महाराजांनी १३ दिवस अनुष्ठान केले होते. त्याची साक्ष देणारे हे शिळा मंदिर असून वारकरी संप्रदयासाठी हा सुवर्णक्षण आहे. या ऐत्याहासिक सोहळ्याचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन भाजपा अध्यात्मिक समन्वय आघाडी बीड जिल्ह्याचे संयोजक हभप विष्णू महाराज सुरवसे यांनी केले आहे.
श्रीक्षेत्र देहूगाव हे संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी अन कर्मभूमीही. मात्र, देहूतील देऊळवाड्यात श्री संत तुकाराम महाराजांची मूर्ती नव्हती, तर केवळ त्यांचे शिळा मंदिर होते. त्यावर चांदीचा मुखवटा बसविला जात होता. हे शिळा मंदिर श्री संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमनानंतर बांधण्यात आले. तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमनांनंतर त्यांच्या वंशजांनी इंद्रायणी नदीच्या डोहात ज्या ठिकाणी रामेश्वर भट्टांनी त्यांची गाथा बुडविली. त्याच डोहाच्या काठावरील एका मोठ्या दगडी शिळेवर संत तुकाराम महाराजांनी १३ दिवस अनुष्ठान (उपोषण) केले.
त्यानंतर १३ दिवसांनी त्यांची गाथा पाण्यावर तरंगल्याचे सांगितले जाते. त्यानंतर काही दिवसांतच संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेले. त्यांच्यापश्चात देहू येथे त्यांचे मंदिरही नव्हते. त्यांच्या वंशजांनी तुकाराम महाराजांचा पदस्पर्श झालेली ही शीळा, त्यांची एकमेव पाऊलखुण म्हणून शिळा कापून येथील देऊळवाड्यात आणली. त्यावर संत तुकाराम महाराजांचा मुखवटा बसविला होता. त्याचे मंदिर वैकुंठस्थानी १९६४-६५ साली बांधले. कालपरत्वे या ठिकाणी तुकाराम महाराजांची मूर्ती असलेले मंदिर नसल्याने भाविक या शिळा मंदिराचे दर्शन घेत होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.