आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रीम विमा:शेतकऱ्यांना अग्रीम विमा देण्याची मागणी

सोनपेठ24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोनपेठ तालुक्यात ऑगस्ट महिन्यात अत्यल्प पाऊस झाला आहे. पावसात मोठा खंड पडल्यामुळे सर्वच पिके करपून गेल्यामुळे शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम पीकविमा देण्याची शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

या हंगामात सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यामुळे पेरणी वेळेवर व योग्य प्रमाणात झाल्यामुळे बहारदार पिके आली होती. परंतु ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्याने हाता तोंडाशी आलेली पिके करपून गेली आहेत. त्यामुळे सोनपेठ तालुक्यातील सर्वच गावात पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे २५ टक्के अग्रीम पीकविमा नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी संघटनेने केली आहे.

बातम्या आणखी आहेत...