आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी‎:नगर परिषदेचे मुख्याधिकारी उमेश ढाकणे‎ यांची बदली रद्द करण्याची मागणी‎

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नगर परिषदेचे मुख्याधिकारी उमेश ढाकणे‎ यांची नुकतीच शासनाने अल्प कालावधीत‎ तडकाफडकी बदली करण्यात आल्याने बीड‎ शहरातील नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला‎ आहे. शासनाला प्रशासनात चांगले काम करणारे‎ अधिकारी नको आहेत, हेच या बदली प्रकरणातून‎ नागरिकांना दिसून येत आहे. ढाकणे यांची झालेली‎ बदली रद्द करून त्यांना त्याच पदावर पुन्हा नियुक्ती‎ देण्यात यावी.

या प्रमुख मागणीचे निवेदन बीड‎ जिल्हा कार्यकर्ता संघटनेच्या वतीने महाराष्ट्राचे‎ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन्न व नागरी पुरवठा मंत्री‎ रवींद्र चव्हाण यांना जिल्हाधिकारी‎ कार्यालयामार्फत पाठवले आहे. यावेळी डॉ. संजय‎ तांदळे सुदाम कोळेकर उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...