आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी व ओबीसी समाजाचे प्रश्न सोडवावेत, अशी मागणी काँग्रेसच्या ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा. संभाजी जाधव व सहकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पेन्शन योजना लागू करून बिहार राज्यांप्रमाणे ओबीसीची जातगणना करावी. तसेच ओबीसी मागासवर्गीय व अल्पसंख्याक समाजाशी संलग्न विविध कर्जमाफी करून शासन दरबारी कोर्टात असलेल्या केसेस माघारी घ्याव्यात, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले आणि आण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा, महाविकास आघाडी सरकार काळात जिल्ह्याच्या ठिकाणी ओबीसी विद्यार्थांना शासकीय वसतिगृह सुरू करण्याच्या निर्णयाची अंबलबजावणी करावी अन्यथा १५ मे २०२३ रोजी राज्यभर आंदोलन करण्यात येईल. यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश ओबीसी काँग्रेसचे सरचिटणीस वसंत मुंडे, शिरूर (का) तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रमेश सानप, बीड शहर काँग्रेसचे अध्यक्ष परवेझ कुरेशी, महाराष्ट्र प्रदेश डॉक्टर सेलचे राज्य समन्वयक डॉ. जयप्रकाश आघाव, किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमोल पाठक, युवक काँग्रेसचे कानिफनाथ विघ्ने, गणेश जवकर, शामसुंदर जाधव, सय्यद फरहान, भारत ढवारे, मोहसीन शेख, अमजद शेख, सय्यद अल्ताब, मुजमील कुरेशी, लहुदास तांदळे, आरिफ शहा, संतोष निकाळजे, विष्णु मस्के, बाळासाहेब बडे यांची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.