आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेवराई तालुक्यातील खामगाव येथील कृषी विज्ञान केंद्राने सिल्लोड येथील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात तृणधान्य जनजागृती स्टॉल लावला होता. राला, भगर, नाचणी, राजगिरा, वरी, मकरा इत्यादी लहान तृणधान्य बियाण्यांची माहिती घेण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठीहजेरी लावली. पाचही दिवस या स्टॉलवर मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली. सिल्लोड येथील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र खामगावने तृणधान्य विषयी जनजागृती केली. या प्रदर्शनामध्ये कृषी विज्ञान केंद्र खामगावचे स्टॉलला प्रचंड गर्दी होती.
आंतरराष्ट्रीय तृणधान्ये वर्ष २०२३ निमित्त कृषी विज्ञान केंद्र खामगाव यांनी विशेष लक्ष देऊन कृषी विज्ञान केंद्राचे प्रक्षेत्रावर खरीप हंगामामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट रिसर्च हैदराबाद इथून विकसित केलेल्या विविध तृणधान्यांचे उत्कृष्ट वाण घेऊन प्राथमिक स्वरूपात लागवड केले होते. लागवड केलेली राला, भगर, नाचणी राजगिरा, वरी, मकरा इत्यादी लहान तृणधान्य बियाणे आकर्षण ठरले. तसेच तृणधान्य मूलवर्धन करून विविध पदार्थ सुद्धा करण्याबाबत महिला शेतकरी, उद्योजिकांनी माहिती घेतली. या प्रदर्शनामध्ये बोरवेल रिचार्ज, कुपनलिका सॉईल कन्सर्वेशन, अझोला, हायड्रोपोनिक्स, नैसर्गिक शेती करिता निविष्ठात निंबोळी अर्क, दशपर्णी, रेशीम उद्योगाची माहिती भित्तीपत्रकांद्वारे देऊन शेतकरी, विद्यार्थी व महिलांना मार्गदर्शन करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.