आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागतवर्षी झालेल्या अतिवृष्टीत उंदरी नदीला आलेल्या पुरात कळंब - अंबाजोगाई रस्त्यावरील पैठण ( सावळेश्वर ) येथील पुलाचे कठडे व काही भाग वाहून गेल्याने हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. या पुलाचे काम करणे अपेक्षित होते. मात्र बांधकाम विभागाने गांभीर्याने न घेतल्याने आता पावसाळ्यात धोका वाढला आहे. कळंब - अंबाजोगाई हा रस्ता मोठ्या रहदारीचा रस्ता असून जड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर आहे.
मात्र गतवर्षीच्या अतिवृष्टीत या रस्त्यावरील पैठण (सावळेश्वर) येथील पुलाचे कठडे आणि काही अवशेष ही वाहून गेल्याने हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. तर नदीकाठच्या अनेक घरात पाणी घुसून संसार उपयोगी साहित्य, जनावरे वाहून गेली होती. अनेकांच्या घरांचे मोठे नुकसान झाले होते. यावेळी या पूरग्रस्त भागाला जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पालकमंत्री धनंजय मुंडे, खा. रजनी पाटील, आ. नमिता मुंदडा, तत्कालीन आ. विनायक मेटे, तत्कालीन जि. प. उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी भेटी देऊन पूरग्रस्तांना मदतीचे व पुलाचे काम तत्काळ करू असा शब्द दिला होता. तहसीलदार दुलाजी मेंडके यांनीही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना लेखी टिप्पणी कळविल्या होत्या.
कळंब - अंबाजोगाई रस्त्यावरील धोकादायक पैठणचा पूल .
चिंचोली - नांदूरघाट पुलाकडे दुर्लक्ष अतिवृष्टीच्या काळात चिंचोली फाटा ते नांदूरघाट रस्त्यावरील दोन पूल वाहून गेले होते. कमी उंचीच्या पुलांमुळे पावसाळ्यात पुरामुळे वाहतूक ठप्प राहत असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला होता. वाहून गेलेल्या पुलांचे काम करून घेण्यासह रस्त्यावर पडलेले खड्डे भरून दुरुस्तीची काम करणे अपेक्षित होते. मात्र याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.लोकप्रतिनिधी भेटण्यासाठी आले, फोटो काढून परत गेले. त्यांनी दिलेल्या शब्दांमुळे अपेक्षा होती. मात्र पूरग्रस्तांना मदत मिळाली नाही. मदत व या पुलाचे काम पूर्ण करून दिलेला शब्द पाळावा. - जयश्री चौधरी, सरपंच, पैठण ता. केज
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.