आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:बीडसह अंबाजोगाईत50 खोके जाळून निदर्शने तर‌ धारुरात जोडे मारो आंदोलन

टीम दिव्य मराठी | बीड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे कृषिमंत्री असलेल्या अब्दुल सत्तार यांनी आमच्या नेत्या तसेच लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल गलिच्छ वक्तव्य केले आहे. हा प्रकार पुरोगामी महाराष्ट्राच्या संस्कृतीचे हनन करतो. या वक्तव्याबद्दल मंत्री अब्दुल सत्तारांचा आम्ही जाहीर निषेध करतो अशी प्रतिक्रिया आ.संदीप क्षीरसागर यांनी दिली आहे. मंगळवारी (दि.८) रोजी आ.संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली बीड राष्ट्रवादीच्या वतीने आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. तसेच अंबाजोगाईत पन्नास खोके जाळून निदर्शने तर‌ धारुरात जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

शिंदे गटाचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खा.सप्रियाताई सुळे यांच्यावर ५० खोक्यावरून टिका केली होती. या दरम्यान अब्दुल सत्तार यांनी सुप्रियाताई सुळे यांच्या बद्दल गलिच्छ शब्दांचा उल्लेख केला होता. एका जबाबदार संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीने असे वक्तव्य करणे निषेधार्ह आहे. बीड येथे आ.क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, काळे झेंडे दाखवत आंदोलन करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी-कॉंग्रेस पक्षाच्या सर्व सेलचे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

अंबाजोगाई : पन्नास खोके जाळून अब्दुल सत्तारांचा निषेध
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी खा. सुप्रिया सुळे यांच्यावर अपशब्द वापरून गलिच्छ भाषेत टीका केली. याचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी आणि कार्यकर्ते मंगळवार दि.८ अंबाजोगाईत रस्त्यावर उतरले. अब्दुल सत्तार यांच्या पुतळ्याला जोडे मारून कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. त्यानंतर अब्दुल सत्तार यांचा प्रतिकात्मक पुतळा आणि त्यांचा फोटो असलेले पन्नास खोके जाळून आंदोलन करण्यात आले. खा. सुप्रिया सुळे यांची बदुल सत्तारांनी व्यक्तिगत माफी मागावी व महिलांबाबत अपमानकारक विधान करणाऱ्या या मंत्र्याचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी माजी आ. संजय दौंड, राजकिशोर मोदी, डॉ. नरेंद्र काळे, बालाजी शेरेकर, तानाजी देशमुख, महादेव आदमाने यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.

धारूर : राष्ट्रवादीचे जोडे मारो आंदोलन
धारूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अब्दुल सत्तार यांच्या प्रतिमेस जोडे मारून आंदोलन किल्ले धारूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्ष माधव निर्मळ बोलत होते या वेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अमोल जगताप, शहराध्यक्ष नितीन शिनगारे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण सिरसट, परमेश्वर तिडके, बालासाहेब मायकर, परमेश्वर राऊत, चंद्रकांत अवताडे, ज्ञानेश्वर शिंदे, सुनील कावळे,सटवा अंडील, बंडू मस्के, विजय घोळवे, चिंतामण सोळंके,पप्पू सोळंके, रंजीत रुपनर,शेख रजाक, शुभम तिबोले सहकार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केज : सत्तारांची हकालपट्टी करा
संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घेऊन मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी केज तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी येवत्याचे सरपंच विलास जोगदंड, नारायण शिंदे, मुकुंद कणसे, संजीवनी देशमुख, वचिष्ट सांगळे, बाळासाहेब महादेव सक्राते, विठ्ठल जाधव, रमेश देशमुख, संजय केदार, सदाशिव मुंडे, सुशील वाघ, दीपक लांडगे हे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...