आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन स्थगित:आता 16 मेऐवजी 5 जूनला बीडमध्ये होणार आंदोलन, आमदार विनायक मेटे म्हणाले - लॉकडाऊन राहिले तरीही करणार आंदोलन

बीड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 18 मे रोजी राज्यभरातील तहसीलदारांना निवेदन देणार असून 5 जूनपर्यंत लॉकडाऊन सुरूच राहिले तरी निषेध करणार आहे.

सुप्रीम कोर्टाने राज्यातील मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर 16 मेपासून बीडमध्ये मराठा आंदोलनाची सुरुवात होणार होती. स्थानिक आमदार आणि शिव संग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे या आंदोलनाचे नेतृत्त्व करत होते. सध्या राज्यात कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता सध्या त्यांच्याकडून हे आंदोलन 4 जूनपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. आमदार मेटे यांनी म्हटले की, आता 5 जूनला पुन्हा मराठा बांधव बीडमध्ये जमा होऊन आंदोलन करतील.

आंदोलन स्थगित करण्याची माहिती देताना मेटे म्हणाले की, पत्र लिहून आणि हात जोडून आरक्षण प्राप्त केले जाऊ शकत नाही. ते पुढे म्हणाले की, 'राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मनात पाप आहे. त्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही. मराठा आरक्षण रद्द करण्यासाठी अशोक चव्हाणांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील तेवढेच जबाबदार आहेत. आरक्षणासाठी कायदेशीर प्रयत्नांची आवश्यकता आहे.'

मेटे म्हणाले की, 18 मे रोजी राज्यभरातील तहसीलदारांना निवेदन देणार असून 5 जूनपर्यंत लॉकडाऊन सुरूच राहिले तरी निषेध करणार आहे.

राज्य सरकारची जबाबदारी
जर केंद्र सर्व काही करत असेल तर तुम्ही काय कराल? मेटेंचा प्रश्न आहे की, हे सर्व लोक मराठा आरक्षणाविषयी बोलत आहेत. याचिका राज्य सरकार द्वारे दाखल केली जाणार होती, मात्र त्यांनी केवळ यावर टीका केली आहे. मेटे म्हणाले की, आम्ही या संबंधी लवकरच राज्यपालांना भेटू आणि राज्यपालांना निवेदन देऊ आणि महाविकास आघाडी सरकारला उत्तर मागू आणि त्यांना समज देऊ. देवेंद्र फडणवीस यांना विनंती करून आम्ही राष्ट्रपतींनाही भेटणार आहोत.

लॉकडाऊन राहिले तरीही होणार आंदोलन
मेटे यांनी म्हटले, 'मराठा समाजाचा आक्रोश दाबण्यासाठी लॉकडाऊन लावले गेले आहे. आम्ही 5 जूननंतर एक आंदोलन करणार आहोत. लॉकडाऊन असले तरीही आम्ही शांत बसणार नाही. यासोबतच आम्ही मंत्र्यांचे वाहने रोखण्याची मागणी करु. त्या दिवशी राज्यात आमदार, खासदार आणि मंत्र्यांना फिरण्याची परवानगी नसेल.'

मेटेंनी अशोक चव्हाणांवर निशाणा साधत म्हटले की, त्यांनी दुरुस्तीबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला होता.

बातम्या आणखी आहेत...