आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छ मुख अभियान:केज रुग्णालयात रुग्णांना दंत‎ आरोग्यविषयक मार्गदर्शन‎‎

केजएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केज येथील उपजिल्हा रुग्णालयात आलेल्या‎ रुग्णांना दंत तज्ज्ञ डॉ.रमण दळवी यांनी दंत व‎ मौखिक आरोग्यविषयक मार्गदर्शन करीत मौखिक‎ आरोग्याची माहिती पत्रिकाचे वितरण करण्यात‎ आले.‎ केज येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय‎ अधीक्षक डॉ. संजय राऊत यांच्या‎ मार्गदर्शनाखाली रुग्णालयाचे डॉ. रमण दळवी‎ यांनी स्वच्छ मुख अभियान अंतर्गत रुग्णालयात‎ आलेल्या सर्व रुग्णांना व उपस्थित कर्मचाऱ्यांना‎ दंत व मौखिक आरोग्याचे महत्त्व व मौखिक‎ आरोग्याची घ्यावयाची काळजी याविषयी‎ मार्गदर्शन केले. त्याचबरोबर ब्रश करण्याची‎ आदर्श पद्धती ही ब्रश व मॉडेल घेऊन सविस्तरपणे‎ डॉ. दळवी यांनी समजावून सांगितली.

सर्व रुग्णांना‎ मौखिक आरोग्याची माहिती असणाऱ्या पत्रिकाचे‎ ( पॅम्प्लेट ) वितरण करण्यात आले. या‎ कार्यक्रमाच्या आयोजनासाठी रुग्णालयातील‎ समुपदेशक सीता गिरी यांनी विशेष सहकार्य केले.‎ कार्यक्रमास प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी‎ बहिरट, देवकते, शोभा साकसमुद्रे, क्ष - किरण‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ तंत्रज्ञ जाधव, औषध निर्माता टेकाळे, सेक्युरिटी‎ गार्ड व कर्मचारी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...