आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्ता परिवर्तन:देवळा सोसायटीवर माउली शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्व; राष्ट्रवादी काँग्रेस नेतृत्वाच्या ताब्यात

अंबाजोगाईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई तालुक्यातील देवळा सेवा सहकारी सोसायटी मध्ये सत्ता परिवर्तन झाले असून अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक राजेभाऊ पवार व सतीश व्यंकटराव पवार यांच्या नेतृत्वाखालील माऊली शेतकरी विकास पॅनलच्या सर्वच्या सर्व उमेदवारांनी चांगली मते घेऊन दणदणीत विजय संपादन केला. राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित पॅनलचा माञ दारूण पराभव झाला असून या पॅनलला सत्ता कायम राखण्यात अपयश आले आहे.

देवळा सेवा सहकारी सोसायटी करीता ३१ मे रोजी मतदान झाले होते. या निवडणुकीत माऊली शेतकरी विकास पॅनल आणि सर्वधर्मसमभाव पॅनल या दोन पॅनल मध्ये थेट लढत झाली. देवळा सेवा सहकारी सोसायटी राष्ट्रवादी काँग्रेस नेतृत्वाच्या ताब्यात होती. राष्ट्रवादीला सत्ता राखण्यात अपयश आले. देवळा सेवा सहकारी सोसायटी मध्ये सत्ता परिवर्तन झाले असून अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक आणि गावचे माजी उपसरपंच राजेभाऊ पवार व सतिश व्यंकटराव पवार यांच्या नेतृत्वाखालील माऊली शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे.

मतदारांनी छञीला पसंती दिली. विजयी उमेदवारांमध्ये सर्वसाधारण कर्जदार गटातून आण्णासाहेब पंडीतराव पवार, गोपाळ गोविंदराव पवार, धनराज शिवदास पवार, धर्मराज बाळासाहेब पवार, मोहन नारायण पवार, सचिन हरिदास पवार, सुधाकर बाबुराव पवार, बालू बब्रुवान शितोळे, महिला राखीव गटातून सुखशैला विजयकुमार पवार, सुषमा सूर्यकांत पवार, भटक्या वि.जा.ज/विमाप्र गटातून अंकुश गंगाराम चौरे, इतर मागासवर्गीय गटातून राजाराम गजेंद्र तेलंग, अनुसूचित जाती जमाती गटातून बळीराम राजाराम सगट यांचा समावेश आहे. या विजयी उमेदवारांच्या निवडीचे ग्रामस्थांनी स्वागत केले. पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत. विजयी उमेदवारांचे गावकऱ्यांकडून अभिनंदन होत आहे.

बातम्या आणखी आहेत...