आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:नगर रोड ते धानोरा रोड डांबरीकरणासाठी वंचितने केले जागरण गोंधळ आंदोलन

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नगर रोड ते धानोरा रोड डांबरीकरणासाठी वंचितचे जागरण गोंधळ आंदोलन सोमवारी नगरपालिकेच्या समोर करण्यात आले. प्रभागातील सहानुभूती मिळविण्यासाठी मोरे व बनसोडे यांचे उपोषण असल्याचा अजय सरवदे यांचा आरोप असलेल्याचे निवेदनात म्हटले आहे.

वंचित बहुजन आघाडीचे अजय सरवदे यांच्या नेतृत्वाखाली धानोरा रोड ते नगर रोडचे डांबरीकरण करण्यासाठी भर रस्त्यावर जागरण गोंधळ आंदोलन करण्याचा इशारा देताच पाच वर्षे सत्ता उपभोगलेल्या दोन्ही नगरसेवकांनी जिल्हाधिकारी कार्यालय बीड समोर उपोषणाचे नाटक करत फसवणूक केलेल्या लोकांची सहानुभूती मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. स्वार्थासाठी पक्ष बदलणाऱ्या नगरसेवकांवर आता जनता विश्वास ठेवणार नाही हे स्पष्ट असताना धडपड केली जात आहे. वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी श्रेयासाठी नव्हे तर जनतेच्या आरोग्यासाठी पुढे येत असताना दिसून आले.

यावेळी वंचितचे जिल्हाध्यक्ष उद्धव खाडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास मंचचे अध्यक्ष डॉ. जितेंद्र ओव्हाळ, जिल्हा महासचिव ज्ञानेश्वर कवठेकर, बबनराव वडमारे, पुष्पा तुरुकमाने, अनुरथजी वीर, किरण वाघमारे, भीमराव बनसोडे, राजू कोठेकर, मुन्ना बनसोडे, अभिजित डोंगरे, दादाराव गायकवाड, वाघमारे, विकी बोराडे, नितीन हंगे, विशाल लोंढे, स्वप्निल शिंदे, प्रणित सरवदे, अमर वंजारे, अरविंद सरवदे, अक्षय आठवले, विकी जाधव, सौरभ औसरमल, महेश निर्मळ, गायकवाड शुभम, अजय शिरसाठ, सुनील वाघमारे, अशोक वंजारे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...