आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवस्थान जमीन घोटाळा:बीडच्या जमीन घोटाळा प्रकरणात उपजिल्हाधिकारी आघाव निलंबित, देवस्थान जमीनप्रकरणी राज्य शासनाची पहिली मोठी कारवाई

बीडएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बीड जिल्ह्यातील देवस्थान जमीन घोटाळा प्रकरणात राज्य शासनाने मोठी कारवाई केली. बीड जिल्ह्यात अनेक जमिनी खालसा केल्याचा आरोप असलेले व आष्टी तालुक्यातील गुन्ह्यांत आरोपी म्हणून समावेश झालेले उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. हे आदेश राज्य सरकारने शुक्रवारी काढले आहेत.

जिल्ह्यात देवस्थान व वक्फच्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाला आहे. आष्टी तालुक्यात ३ गुन्हे, तर बीडच्या शिवाजीनगर पोलिसांत एक गुन्हा दाखल आहे. यात भूसुधार विभागाचे तत्कालीन उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव यांचा आरोपी म्हणून समावेश करण्यात आलेला आहे. दरम्यान, हे गुन्हे दाखल होण्यापूर्वीच भूसुधारच्या जमीन खालसा प्रकरणात प्रकाश आघाव यांनी अनियमितता केल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी आणि विभागीय आयुक्तांनी शासनास दिला होता.