आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार‎:उपशिक्षणाधिकारी अरुणा काळे यांचा सत्कार‎

धारूर‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

किल्लेधारूर येथील आदर्श शिक्षिका‎ अरुणा काळे यांची लातूर जिल्हा परिषदेत ‎उपशिक्षणाधिकारी पदी निवड‎ झाल्याबद्दल त्यांचा बॅच १९९९ च्या वतीने ‎ ‎ सत्कार करण्यात आला.‎ आदर्श शिक्षिका अरुणा काळे यांचे ‎विद्यार्थी डॉक्टर, स्पेशालिस्ट, अभियंता, शास्त्रज्ञ, टेकनोलोजिस्ट,शेतकरी, ‎शासनाच्या व प्रायव्हेट सेक्टरच्या विविध पदावर व उच्च पदावर, देश सेवेसाठी‎ विविध क्षेत्रात विविध पदांवर कार्यरत‎ आहेत. विद्यार्थी जडणघडणीत त्यांचे‎ योगदान मोलाचे असल्याचे विद्यार्थी‎ बोलून दाखवतात. त्यांनी आपल्या‎ कारकीर्दीत शिक्षणाबरोबर संस्कार व‎ शिस्तीचे मूल्य त्यांनी विद्यार्थ्यांना दिले.‎

आपल्या कार्याने यशोशिखर गाठणाऱ्या‎ काळे यांची निवड झाल्याबद्दल वर्गमित्र‎ १९९९ बॅच कडून त्यांचा सत्कार करण्यात‎ आला. आदर्श सेवानिवृत्त शिक्षक‎ भास्कर ताथोडे, सुनील ताथोडे यांच्या‎ हस्ते सत्कार करण्यात आला.‎ यावेळी सुरेश शेळके, दिनेश कापसे,‎ नाथा ढगे, रामेश्वर खामकर, सुरेश‎ शिंपले, ज्ञानेश्वर कदम, अरुण पिलाजी,‎ महेश डुबे, मुजीब अत्तार, भगवान‎ रहेकवाल, मनीषा सोनवणे, अमर लोकरे,‎ किरण वाव्हळ, सचिन माने, अरुण‎ चोपडे, विशाल खिंडरे हे उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...