आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षणाचा हक्क:काळेगावच्या विवेकानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची मान्यता रद्द

बीड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियमानुसार बीड तालुक्यातील काळेगाव (हवेली) येथील आदर्श महिला मंडळ संचलित विवेकानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची मान्यता शासनाने रद्द केली आहे. राज्य शासनाच्या शिक्षण विभाग, शिक्षण संचालक पुणे आणि विभागीय शिक्षण उपसंचालक औरंगाबाद यांनी बीडच्या शिक्षणाधिकाऱ्यांना याबाबतचे आदेश देऊन, शाळेची मान्यता रद्द करण्याबाबत कळवले आहे. काळेगाव हवेली येथील विवेकानंद विद्यालयाबाबत ग्रामस्थ व शिक्षकांच्या अनेक तक्रारी होत्या. या तक्रारीची चौकशी करुन, या शाळेची मान्यता रद्द करण्याबाबतचा अहवाल शिक्षण संचालनायाकडे पाठवण्यात आला होता. बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम तरतुदीनुसार शाळेची मान्यता रद्द करण्यात आली आहे. या शाळेतील इयत्ता ८ वी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे नजकीच्या शाळेत समायोजन करण्याबाबत कळवण्यात आले आहे.

काळेगाव हवेली येथील विवेकानंद शाळेबाबत आलेल्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने केलेल्या चौकशीत शाळेतील शैक्षणिक व भौतिक सुविधाबाबत तपासणी करुन शाळेमध्ये शाळेची इमारत, रॅम्प, पाण्याची व्यवस्था नसल्याचे दिसून आले होते. बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनयमानुसार शाळेने भौतिक सुविधांचा पूर्तता केली नाही. त्रुटीबाबत खुलासा करण्याची नोटीस देऊनही संस्थेने खुलासा केला नाही. त्यामुळे संस्थेची मान्यता रद्द करण्याबातचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता, या प्रस्तावास राज्याच्या शिक्षण विभागाने अखेर मान्यता दिली.

बातम्या आणखी आहेत...