आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:रात्री रेल्वे प्रवाशास सोडणे जिवावर‎ बेतले; अॅटोचालकासह एक ठार‎

परळी‎24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळीच्या डॉ.शामाप्रसादजी मुखर्जी‎ उड्डाणपुलाने धूलिवंदनाच्या पूर्वसंध्येला दोघांचा‎ बळी घेतला. मध्यरात्री तालुक्यातील दगड वाडी‎ येथील रेल्वे प्रवाशाला सोडुन परळीकडे येत‎ असताना राख वाहतुक करुन परळी बाहेर‎ जाणाऱ्या वाहनाने जोराची धडक दिली. या‎ अपघातात ऑटो चालक जागीच ठार झाला तर‎ सोबतच्या युवकाचा रुग्णालयात उपचार सुरु‎ असताना मृत्यु झाला. ८ मार्च रोजी पहाटे ३‎ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.‎ मालेवाडी येथील राजेश पोटभरे हा २५ वर्षीय‎ युवक परळीत अॅटो चालवून आई-वडिलासह‎ शाहुनगर वस्तीत राहातो. तो रात्रीच्या वेळी रेल्वे‎ परिसरात रिक्षा चालवतो. बुधवारी पहाटे‎ शिर्डी-काकीनाडा एक्स्प्रेसमधून उतरलेले काही‎ प्रवासी त्याला मिळाले. प्रवाशांना सोडण्यासाठी‎ ८ कि. मी. लांब जायचे म्हणुन मित्र आशिष ताटे‎ यास सोबत घेतले पहाटे २ ते ३ च्या दरम्यान‎ प्रवाशी सोडुन परत येत असताना उड्डाणपुलावर‎ भरधाव टिप्परने जोराची धडक दिली.

यात‎ ॲटोचा चक्काचूर झाला.या अपघातात पोटभरे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ याचा जागीच मृत्यू झाला तर ताटे याचा‎ अंबाजोगाई येथे उपचारादरम्यान मृत्यु झाला.‎ बायपास पूर्ण, वाहतूक बंद‎ परळी शहरातून होत असलेली जड वाहनांची‎ वाहतुक ईटके कॉर्नर येथुन टोकवाडी जवळुन‎ अंबाजोगाई मार्गाकडे वळविणारा परळी‎ बायपास हा चार पदरी मार्ग पुर्ण झालेला‎ आहे.परंतु या मार्गावरुन अद्याप वाहतुक‎ वळवण्यात येत नसल्याने परळीच्या‎ उड्डाणपुलावर वाहतुक कोंडी,अपघात‎ नित्याचे बनले आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...