आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकासकामे:नियाेजन समितीच्या निधीतून  जिल्ह्यात हाेतील विकासकामे

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रस्तावित कामे, प्रशासकीय मान्यता, प्राप्त निधी, झालेला खर्च तसेच कामांची प्रगती, २०२१-२२ मधील कामांचे दायित्व व २०२२-२३ मधील मंजूर सर्व बाबींचा विचार करून नियोजन समितीमार्फत समसमान निधी वितरणातून जिल्ह्यात विकासकामे हाेतील, अशी ग्वाही सहकार, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (दि. ७) आयोजित आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. पालकमंत्री सावे यांचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी स्वागत केले. या वेळी आमदार लक्ष्मण पवार, आमदार नमिता मुंदडा, अपर जिल्हाधिकारी मंजूषा मिसकर, अतिरिक्त जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळुंके, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत आदींसह विविध खातेप्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री सावे म्हणाले, की खातेप्रमुखांनी जनहिताच्या कामांसाठी आवश्यक निधीसंदर्भात यादी सादर करावी, सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्याचे निर्देश दिले. पीक विमा अग्रिमसंदर्भात विम्या कंपन्यांशी वित्त विभागाची बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. आरोग्य विभागाच्या योजना राबवण्यासाठी आवश्यक शासकीय निधीसह गरजेनुरूप रुग्णवाहिकांसाठी सीएसआरमधून निधीसाठी प्रयत्न करण्यात येतील. े बंद ट्रान्सफॉर्मर त्वरित बदली करण्याबाबत प्राधान्याने कार्यवाहीचे आदेश त्यांनी दिले.

दिवाळीआधी हाेणार बैठक
पालकमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीमध्ये आज जिल्हास्तरीय विभागनिहाय आढावा घेण्यात आला आहे. जिल्हा नियाेजन संदर्भात दिवाळीआधी नियाेजन समितीची बैठक घेतली जाईल, त्यादृष्टीने तयारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. - राधाबिनाेद शर्मा, जिल्हाधिकारी, बीड.

बातम्या आणखी आहेत...