आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:कावड यात्रेत सर्व शिवसैनिकांसह भाविकांनी सहभागी व्हावे : जाधव

माजलगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मराठवाडा संपर्क नेते चंद्रकांत खैरे, बीड जिल्हा संपर्कप्रमुख धोंडू पाटील, बीड जिल्हा सहसंपर्कप्रमुख बाळासाहेब अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बीड जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना प्रणित कावड यात्रेचे आयोजन माजलगाव मध्ये करण्यात आले आहे.

२२ ऑगस्ट २०२२ रोजी ही कावड यात्रा प्रभू पुरुषोत्तम मंदिर पुरुषोत्तमपूरी येथून पहाटे ५ वाजता प्रस्थान करणार आहे. त्यानंतर माळेवाडी, किट्टी आडगाव, पायतळवाडी, सावरगाव, केसापुरी कॅम्प या मार्गाने मार्गक्रमण करून श्री सिद्धेश्वर मंदिर माजलगाव येथे जलाभिषेक होणार आहे. तरी या कावड यात्रेत सर्व शिवसैनिकांनी व भाविक भक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी केले आहे. ही कावड यात्रा सवाद्य असून भारुड आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम या कावड यात्रेदरम्यान पार पडणार आहे. या कावड यात्रेच्या संयोजन समितीमध्ये दिगंबर सोळंके, तीर्थराज पांचाळ, नामदेव सोजे, संजय शिंदे, माऊली कदम, प्रभाकर धरपडे, प्रल्हाद घाटुळ, नारायण तौर, महादेव सुरवसे, कामराज डाके, कल्याण मोहिते, दादा मोहिते, महादेव वैराळे, शंकर पवार, शरद शिंदे, संभाजी पाष्टे, परमेश्वर नायगावकर, महेश थेटे, राहुल सुरवसे, रुपेश घोडके, लक्ष्मण सोळंके, अंगद नाईकनवरे, राम कुलकर्णी, जयराम राऊत, करण थोरात, सुखदेव धुमाळ, कैलास कांबळे यांचा समावेश आहे. या यात्रेनिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन आप्पासाहेब जाधव यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...