आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपसरपंच‎ पदासाठी निवड:देवठाणा उपसरपंचपदी‎ पंचफुलाबाई राठोड‎

दिंद्रूड‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देवठाणा-जैतापूर ग्रुप‎ ग्रामपंचायतच्या उपसरपंच‎ पदासाठी निवडणुकीत भागवत‎ दराडे यांच्या पॅनलच्या‎ पंचफुलाबाई हरिभाऊ राठोड या‎ विजयी झाल्या. विजयानंतर‎ येथील कार्यकर्त्यांनी जल्लोष‎ केला.‎ धारूर तालुक्यातील‎ देवठाणा-जैतापूर ग्रुप ग्राम‎ पंचायतच्या ९ सदस्यांसाठी व‎ सरपंच पदासाठी १८ डिसेंबर रोजी‎ मतदान होऊन २० डिसेंबर रोजी‎ निकाल जाहीर झाला.आ.प्रकाश‎ सोळंके व युवानेते जयसिंह‎ सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली व‎ राष्ट्रवादी युवक जिल्हा‎ सरचिटणीस भागवत दराडे यांच्या‎ नेतृत्वाखालील पॅनलच्या सरपंच‎ पदाच्या उमेदवार छायाताई‎ चौरे(दराडे) यांनी यश संपादन‎ करून विजयश्री मिळवला.‎

येथील उपसरपंच पदासाठी ३१‎ डिसेंबर रोजी नुतन सरपंच छाया‎ चौरे यांच्या अध्यक्षतेखाली व‎ निवडणूक निरीक्षक गणेश गिरी व‎ निवडणूक अधिकारी डी.बी.डांगे‎ यांच्या उपस्थितीत झालेल्या‎ निवडणुकीत पंचफुलाबाई‎ हरिभाऊ राठोड यांनी विरोधी‎ उमेदवारावर मात करून‎ दणदणीत विजय मिळवला.या‎ विजयानंतर कार्यकर्त्यांनी‎ फटाक्यांची आतषबाजी व‎ गुलालाची उधळण करत जल्लोष‎ केला.‎

बातम्या आणखी आहेत...