आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिबट्याचे वाढते हल्ले:बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांचे धनंजय मुंडेंनी केले सांत्वन, म्हणाले - 'नागनाथच्या दोन्ही मुलांची जबाबदारी माझी'

आष्टी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तीन दिवसात बंदोबस्त न झाल्यास बिबट्याला ठार करण्यासाठी प्रस्ताव देऊ - मुंडे

'नागनाथ हा माझा अत्यंत निकटवर्तीय होता, मी त्याला दाजी म्हणायचो, माझ्या बहिणीची व नागनाथच्या दोन्ही मुलांची जबाबदारी मी स्वीकारतो असे म्हणत धनंजय मुंडे यांनी बिबट्याच्या हल्ल्यात मयत नागनाथ गर्जे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी नागनाथ यांचा मुलगा व मुलगी या दोन्ही अपत्याच्या शिक्षणाची जबाबदारी आपण स्वीकारत असून त्यांच्या पत्नीला शासकीय सेवेत नोकरी मिळण्यासाठीही आपण प्रयत्न करणार असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.

आष्टी तालुक्यातील सुरुडी व किन्ही या दोन ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात नागनाथ गर्जे, तसेच मामाच्या गावी आलेला नऊ वर्षीय यश उर्फ स्वराज भापकर अशा दोघांचा वेगवेगळ्या घटनेत मृत्यू झाला होता. त्यानंतर आज जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी गर्जे यांच्या कुटुंबियांची तसेच यश उर्फ स्वराज भापकर याच्या मामाकडे असलेल्या नातेवाईकांची भेट घेऊन सांत्वन केले.

मयत नागनाथ गर्जे यांच्या कुटुंबास राज्य शासनाच्या वतीने 5 लाख रुपयांचा धनादेश यावेळी वनाधिकारी तेलंग यांच्या हस्ते देण्यात आला. तसेच नागनाथ यांच्या दोन्ही मुलांच्या नावे योजनेप्रमाणे प्रत्येकी 5 लाख रुपयांचा एफडी करून त्याच्या पावत्या कुटुंबाकडे देण्याच्या सूचना ना. मुंडेंनी केल्या. त्याचबरोबर स्वराज भापकर याच्या मावशी काका यांसह अन्य नातेवाईकांचीही भेट घेऊन या चिमुकल्याच्या कुटुंबसही याच योजनेअंतर्गत 15 लाखांची मदत मिळवून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान या दोन घटनांमुळे आष्टी तालुक्यात भीतीचे वातावरण असून या बिबट्याला तातडीने जेरबंद करण्यासाठी वन विभागाकडून आखण्यात आलेल्या उपाययोजनांचा मुंडेंनी आढावा घेतला. बिबट्याला पकडण्यासाठी शार्पशूटर, पिंजरे, सापळे यासह ड्रोनची मदत घेतली जात असल्याचे यावेळी वनाधिकारी तेलंग म्हणाले.

आपण वनमंत्री संजय राठोड यांच्याशी या गंभीर विषयी चर्चा केली असून या बिबट्याला तातडीने पकडण्यासाठी नांदेड, जुन्नर, पुणे, औरंगाबाद, अमरावती आदी ठिकाणांहून शार्पशूटर व अन्य तज्ज्ञाची आणखी एक कुमक येथे दाखल होणार असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. तसेच येत्या तीन दिवसांच्या आत या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले नाही तर, आपण स्वतः शार्पशूटर मार्फत त्याला ठार करण्याची परवानगी वन्य जीव विभागकडून घेऊ असेही धनंजय मुंडे ग्रामस्थांशी बोलताना म्हणाले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser