आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीड:घरात राजकीय वैर असले तरी संवाद असावा अशी माझी पहिल्यापासून इच्छा; धनंजय मुंडेंची भावनिक साद

परळीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आणि घर घराच्या ठिकाणी असावे, असे मानणारा मी आहे : धनंजय मुंडे

सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज त्यांचे काका स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळी येथील गोपीनाथ गड येथे जाऊन जयंतीनिमित्त अभिवादन केले. गोरगरीब, दीन दुबळ्यांची सेवा करण्याचा, संघर्षाचा वसा आणि प्रेरणा घेऊन काम करतो आहे. आजही तुम्ही आमच्यात नाहीत ही गोष्ट मन मान्यच करत नाही असे म्हणत ते त्रिवार नतमस्तक झाले. तसेच त्यांनी यावेळी बोलताना मुंडे कुटुंबाच्या नात्यावरही भाष्य केले.

कुटुंबाच्या नात्यावर काय म्हणाले धनंजय मुंडे ?

धनंजय मुंडे म्हणाले की, "आज साहेबांची जयंती म्हटले की मनाला वेदना होतात. अप्पांचा वाढदिवस मी परळीत मोठ्या थाटात साजरा करायचो. त्यांच्या जाण्यानंतर मुंडे कुटुंबात या पिढीतला मी सर्वात मोठा आहे. घरात राजकीय वैर असले तरी संवाद असावा अशी माझी पहिल्यापासून इच्छा आहे. तसे झाले तर आमची काहीच अडचण नाही. शेवटी राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आणि घर घराच्या ठिकाणी असावे, अस मानणारा मी आहे.''

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser