आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिष्ठा पणाला:धारूर बाजार समिती निवडणूक; 17 जागांसाठी 38 जण रिंगणात

धारुर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू असून अर्ज मागे घेण्याच्या दिवशी १७ जागेसाठी ३८ जण रिंगणात उतरले आहेत. १५ डिसेंबर रोजी ही निवडणूक होत आहे. बाजार समितीची निवडणूक आता अटीतटीची होत आहे. भाजप-राष्ट्रवादीच्या गटात सामाना होणार आहे. ग्रामपंचायतच्या निवडणुकीबरोबरच बाजार समितीची निवडणूक होत असल्यामुळे ग्रामीण भागातील वातावरण आता चांगलेच ढवळून निघणार आहे. बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये बुधवारी रोजी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ३३ जणांनी माघार घेतली आहे. एक जागा बिनविरोध निघाल्याने आता १७ जागेसाठी निवडणूक होणार आहे.

या जागेसाठी ३८ जणांचे एकूण ३९ उमेदवारी अर्ज रिंगणात आहेत. काही जागेसाठी आता सरळ लढत होत असून काही अपक्ष ही अर्ज राहिले आहेत. अपक्षामुळे आता दोन्ही गटाची काहीशी डोकेदुखी होणार आहे. तरीही भाजप आणि राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये समोरासमोर लढत होत आहे. ही निवडणूक आता भाजप व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रतिष्ठेची केली आहे. राष्ट्रवादीकडून आ.प्रकाश सोळंके यांनी तर भाजपकडून जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ मुंडे व भाजप नेते रमेश आडसकर यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

बातम्या आणखी आहेत...