आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिनविरोध:धारूर बाजार समिती निवडणूक : उमेदवारी अर्ज छाननीत नऊ अर्ज बाद, एक जागा बिनविरोध

धारूर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत १८ जागेसाठी ८१ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते . मंगळवारी झालेल्या छाननीत नऊ अर्ज नामंजूर झाले असून ७२ अर्ज मंजूर झाले आहेत. सेवा सहकारी सोसायटीतून इतर मागासवर्गीय प्रगवर्गातुन दाखल झालेल्या ५ पैकी चार अर्ज नामंजूर झाल्याने विठ्ठल गोरे यांची उमेदवारी बिनविरोध निकाली निघाली आहे.

बाजार समितीची निवडणूक अटीतटीची होत असून १८ जागेसाठी ८१ उमेदवारी अर्जावर मंगळवारी छाननीची प्रक्रिया होवुन छाणनीत इच्छुक उमेदवारांनी तक्रार केली नसली तरी कागदपत्राच्या त्रुटीमुळे ९ उमेदवारी अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये सेवा संस्थेतून नरोटे गणेश सावळा यांचे जात वैधता प्रमाणपत्र नसल्यामुळे अर्ज नामंजूर करण्यात आला आहे. इतर मागास प्रवर्गातून जात वैधता प्रमाणपत्र नसल्यामुळे संतोष शिरसागर, पंडित साक्रूडकर, श्रीधर आडसुळे, विष्णू यादव या चार जणांचे उमेदवारी अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. ग्रामपंचायत मतदार संघातून सुधाकर मोरे, पौर्णिमा भोजने यांचे अनुसूचित जातीचे जात वैधता प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांचे अर्ज नामंजूर झाले आहेत. दुर्बल घटकातून कौशल्य नांदे यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला आहे.

व्यापारी मतदार संघातून सूचक व अनुमोदक दोन वेळा असल्यामुळे विष्णू दरेकर यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला आहे. एकूण ८१ उमेदवारी अर्जा पैकी ७२ अर्ज वैद्य ठरले असून नऊ अर्ज नामंजूर झाले आहे. अर्ज नामंजूर झाल्याने सायंकाळी ५ वाजता पुन्हा छाननी करण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...