आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहणी:धारूर पं. स. च्या धोकादायक इमारतीची कार्यकारी अभियंत्यांकडून अखेर पाहणी

धारूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील पंचायत समितीच्या इमारतीला पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने ही इमारत धोकादायक बनली असून कर्मचाऱ्यांची जीव कायम टांगणीला असताे. त्यामुळे जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी या धोकादायक इमारतीची पाहणी केली. यानंतर त्यांनी तत्काळ दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू केला. जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चांदवडकर यांनीही भेट देऊन इमारतीची पाहणी केली.

धारूर येथील पंचायत समितीची इमारत मागील पंधरा वर्षांपूर्वी बांधकाम करण्यात आले. ही इमारत भव्य स्वरूपाची आहे. परंतु बांधकामानंतर अवघ्या दोन वर्षातच या इमारतीला मोठ्या प्रमाणात भिंतीला भेगा पडल्यामुळे गळती सुरू झाली आहे. दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसांत ही इमारत गळत असल्यामुळे येथील रेकॉर्ड भिजण्याची कर्मचाऱ्यांना भिती असते. अनेकदा पावसाळ्याच्या दिवसात येथील काही खोल्यांत पाण्याचे डोह साचलेले असतात तर काही ठिकाणी इमारतीच्या रूम मधील फरशी दबून खड्डे पडले आहेत.

रेकॉर्ड सांभाळणे कठीण पंचायत समितीमध्ये सर्व विभागाचे रेकॉर्ड मोठ्या प्रमाणात आहे. पावसाळ्याच्या दिवसात या इमारतीला थोडा ही पाऊस झाला की गळती सुरू होते रेकॉर्ड भिजू नये म्हणून अनेकदा कधी जमिनीवर तर कधी इतरत्र रूममध्ये हलवावे लागत आहे. कर्मचाऱ्यांना पावसाळ्याच्या दिवसात काम करणे कठीण होत आहे .-आर. एस. कांबळे, गटविकास अधिकारी

बातम्या आणखी आहेत...