आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंट काँक्रीटचे काम अपूर्ण आहे. शहरातील जालना रोडवरील काकू-नाना हॉस्पिटल ते राष्ट्रवादी भवन दरम्यानच्या मार्गासाठी १८ कोटी रुपयांचा निधी खर्च करूनही हे काम अपूर्ण आहे. या मार्गाचे साइडपट्टे काही ठिकाणी भरले नाहीत, तर काही ठिकाणी मुरुमाने भरल्याने आता पावसाळ्यात चिखल होऊन वाहने घसरत आहेत.शहरातील जालना रोडवरील दुभाजकाचे काम अर्धवट आहे. दोन रस्त्यांच्या दुभाजकात माती भरलेली असून माती दबल्याने खड्डे पडलेले आहेत. सध्या दुभाजकात वाहने अडकून अपघात घडताहेत. वाहनचालक व पादचाऱ्यांच्या अंगावर चिखल उडत असून अनेकदा वाद झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत.
प्रशासनाच्या निषेधार्थ सोमवारी बेशरमची झाडे लावून आंदोलन : बीड शहरातून जाणारा धुळे-सोलापूर हा महामार्ग सध्या कंत्राटदार, अधिकारी यांच्या दुर्लक्षाने रखडला आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी येत्या सोमवारी (१ ऑगस्ट) शहरातील जालना रोडवरील अर्धवट काम झालेल्या माती भरलेल्या दुभाजकात डॉ. गणेश ढवळे, शेख युनूस, सय्यद आबेद, मुबीन शेख हे बेशरमची झाडे लावून आंदोलन करणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.