आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रम‎:जीवन विद्या मिशनतर्फे बीडला संस्कार‎ विद्यालयात संवाद व उद्बोधन कार्यक्रम‎

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील संस्कार प्राथमिक विद्यालयात येथे‎ पाचवी ते सातवी विभागात जीवन विद्या मिशन तर्फे‎ उद्बोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.‎ या कार्यक्रमास व्यासपीठावर प्रमुख वक्ते म्हणून‎ संतोष तोत्रे यांची तर दिगंबर शिंदे यांची प्रमुख अतिथी‎ म्हणून उपस्थिती होती. मुख्याध्यापिका जाधव एल‎ .बी. आणि विभाग प्रमुख सुनील सोनवळकर यांची‎ व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

आपल्या‎ मनोगतात संतोष तोत्रे यांनी विद्यार्थ्यांनी अंधश्रद्धा‎ निराशा दैववाद यांच्या आहारी न जाता योग्य सद्गुण‎ व कौशल्य आत्मसात करून जीवनात सुख शांती‎ समाधान प्राप्त करून घेण्यासाठी कार्यरत राहावे असा‎ संदेश दिला विद्यार्थ्यांना आवडेल अशा सहज सोप्या‎ भाषेमध्ये त्यांनी राष्ट्रप्रेम, राष्ट्रनिष्ठा, जीवनातील नीती‎ मूल्यांची आवश्यकता प्रयत्न वादाची अनिवार्यता‎ समजावून सांगितली देशाच्या व समाजाच्या उत्कर्ष व‎ उन्नतीसाठी आपण कौशल्य मिळवावीत असे‎ विद्यार्थ्यांना समजावून सांगितले या कार्यक्रमाचे‎ सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बर्दापूरकर यु .एस.‎ यांनी केले.‎

बातम्या आणखी आहेत...