आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुविधा:बीड शहरात डायलिसिसच्या रुग्णांना मोफत सुविधा मिळणार

बीड18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

किडनीविकारग्रस्तांना डायलिसिसची गरज भासत असल्याने उपचार सातत्याने घ्यावे लागतात, या उपचारांचा खर्च परवडत नाही. आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या रुग्णांना बीडच्या रोटरीच्या वतीने डायलिसिसची मोफत सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. बीड शहरातील लाइफलाइन हॉस्पिटल, नगर रोड येथे हे रोटरी डायलिसिस सेंटर कार्यान्वित केले जाणार असून त्याचे लोकार्पण १० सप्टेंबर रोजी केले जाणार आहे.

रोटरी क्लब ऑफ बीडच्या वतीने पत्रकार परिषदेस रोटरीचे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर हरीश मोटवानी, अध्यक्ष कल्याण कुलकर्णी, प्रोजेक्ट चेअरमन प्रा. सुनील जोशी, वाय. जनार्दन राव, डॉ. संतोष शिंदे, संतोष पवार उपस्थित होते. बीड शहरातील लाइफलाइन हॉस्पिटल, नगर रोड येथे रोटरी डायलिसिस सेंटरचे १० सप्टेंबर रोजी लोकार्पण झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सायंकाळी ४ वाजता मुख्य कार्यक्रम होणार आहे. रोटरी इंटरनॅशनल डायरेक्टर पीडीजी डॉ. महेश कोटबागी, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गित्ते, द कुटे ग्रुपच्या मॅनेजिंग डायरेक्टर अर्चना सुरेश कुटे, रुकमेश जखोटिया, प्रमोद पारिख, डॉ.अनुराग पांगरीकर, डॉ. संतोष शिंदे यांची उपस्थिती असणार आहे. पहिल्या टप्प्यातील नावनोंदणी कार्यक्रमस्थळीच होणार आहे. मशीनची उपलब्धता व वेळ याचे योग्य नियोजन होण्याच्या दृष्टीने रुग्णांनी पूर्व नावनोंदणी करावी, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ बीडच्या वतीने करण्यात आले आहे. या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन कल्याण कुलकर्णी, मेघा गुप्ता, मोईन शेख, सतीश शिंगटे, प्रा. सुनील जोशी, मनोहर महाजन, वाय. जनार्दन राव, क्षितिज झावरे, राजेश मुनोत, विकास उमापूरकर यांनी केले आहे.

शनिवारी पाच मशीनचे राेटरी क्लबकडून लोकार्पण; गरीब, गरजूंची होणार सोय औरंगाबाद, पुण्याचा हेलपाटा वाचणार या सेंटरमुळे अनेक रुग्णांना औरंगाबाद, लातूर, अहमदनगरचा हेलपाटा वाचणार आहे. गरजू व दुर्बल रुग्णांसाठी (पिवळे रेशन कार्डधारकांना) प्रत्येक महिन्याला २०० डायलिसिस पूर्णतः मोफत करण्यात येणार आहेत. केशरी रेशन कार्ड असणाऱ्या रुग्णांसाठी फक्त ९०० रुपये व पांढऱ्या रेशन कार्ड असणाऱ्या रुग्णांसाठी १२०० रुपये अल्पदरात डायलिसिस केले जाणार आहे.

प्रोजेक्टसाठी पन्नास लाख रुपयांचा खर्च

या प्रोजेक्टसाठी लागणारी ५० लाख रुपयांची रक्कम द रोटरी फाउंडेशन, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२, रोटरी क्लब ऑफ बीड, रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी, रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊन, तसेच फॉरेन पार्टनर रोटरी क्लब ऑफ मियामी एअरपोर्ट, डिस्ट्रिक्ट ६९९० (अमेरिका) यांच्या माध्यमातून देण्यात आली. द कुटे ग्रुप फाउंडेशन, हॉटेल अन्विता तसेच प्रिया एजन्सीज यांचेही आर्थिक योगदान लाभले आहे.

बातम्या आणखी आहेत...